डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श सार्वजनिक जयंतीची मिरवणूक उद्या मिलिंद कॉलेजपासून निघणार

डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श सार्वजनिक जयंतीची मिरवणूक उद्या मिलिंद कॉलेजपासून निघणार 

परळी(प्रतिनिधी):- विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समिती, परळी आयोजित भव्य जयंतीची मिरवणूक उद्या दुपारी 3 वाजता मिलिंद महाविद्यालयापासून निघणार असल्याचे सुकाणू समितीने म्हटले आहे.या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले
आहे.
        उद्या दि .14 एप्रील 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता परळी येथील मिलिंद कॉलेज, सावित्रीबाई फुले चौकातून निघणाऱ्या या मिरवणुकीत  लेझिम, टालग्या, ग्रुप डान्स, बंजारा महिला डान्स, वासुदेव गीत, ब्रास बँड अशा पारंपारिक वाद्यासह ही मिरवणूक निघणार आहे. सदरील मिरवणूक टॉवर मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तिचा समारोप होणार आहे.
    तरी सर्वानी या जयंती मिरवणूकीत सहभागी व्हावे असे आवाहन जयंती समितीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने