16 सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या परळीत निघणार भव्य मिरवणुका
आचारसंहितेमुळे बॅनर लावण्यावर पडला फरक
परळी प्रतिनिधी. महामानव ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त परळी शहरातून 16 सार्वजनिक डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळांच्या वतीने भव्य मिरवणुका करण्यात येणार आहेत . दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्याने नेत्याचे बॅनर लावायचे नाही यासंदर्भात कार्यकर्ते संभ्रमात असल्याने बॅनरवर मात्र परिणाम पडल्याचे चित्र दिसत आहे.
उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे .परळी शहरातही जयंतीचे धामधूम मोठ्या प्रमाणात दिसत आहे .परळी शहरातील एकूण 16 सार्वजनिक जयंती मंडळांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यामध्ये संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने एकूण 14 सार्वजनिक जयंती उत्सव कमिट्यांना मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे .त्यामध्ये दोन मंडळांच्या मिरवणुका या सकाळच्या सत्रात निघणार आहेत .
तर 14 मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघणार आहेत .शहर पोलिसांच्या वतीने दोन सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी यांना सायंकाळी मिरवणुकीचा परवाना देण्यात आला आहे .जयंतीच्या निमित्ताने परळी शहरातील विविध वस्त्यांमधून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसते.
तर 14 मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघणार आहेत .शहर पोलिसांच्या वतीने दोन सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी यांना सायंकाळी मिरवणुकीचा परवाना देण्यात आला आहे .जयंतीच्या निमित्ताने परळी शहरातील विविध वस्त्यांमधून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसते.
दरम्यान 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाली आहे .त्यामुळे आचारसंहितेत सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावायचे असतील तर नगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे .नगरपालिका शुल्क आकारून परवानगी देत आहे .परंतु प्रत्येक वर्षी जसा बॅनर लावण्यासाठी उत्साह असतो तसा उत्साह यावर्षी कार्यकर्त्यात दिसून येत नाही .बॅनरवर नेत्यांचे फोटो लावायचे की नाही .नेत्यांचा फोटो न टाकता बॅनर काढावे की नाही या संदर्भात अनेक कार्यकर्ते गोंधळात असल्याने म्हणावे तितके बॅनर सार्वजनिक ठिकाणी दिसून येत नाहीत. परंतु आंबेडकरी अनुयायांमधून डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा