डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या होणाऱ्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - विकास वाघमारे

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या होणाऱ्या  रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - विकास वाघमारे 

परळी प्रतिनिधी.       महामानव ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 18 एप्रिल रोजी फुले ,शाहू , आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र  दैनिक सम्राट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे.
    याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे . रक्तदानामुळे अनेकांचे जीवन वाचू शकते.तसेच
विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वैचारिक , प्रबोधनात्मक तसेच सामाजिक कार्याने संपूर्ण जगात साजरी करण्यात येते .त्या अनुषंगाने फुले ,शाहू , आंबेडकरी  चळवळीचे मुखपत्र दैनिक सम्राट च्या वतीने उद्या 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता परळी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
      या शिबिरात परळी तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने