आजच्या काळात लेखन करणे हीच मोठी क्रांती - डॉ.अनिलकुमार साळवे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे यांच्या हस्ते झाले संमेलनाचे उद्घाटन

आजच्या काळात लेखन करणे हीच मोठी क्रांती - डॉ.अनिलकुमार साळवे
  

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे यांच्या हस्ते झाले संमेलनाचे उद्घाटन


 माजलगाव प्रतिनिधी:-

आजच्या काळात लेखन करणे हीच मोठी क्रांती आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक दिग्दर्शक प्रा. डॉ.अनिलकुमार साळवे यांनी केले ते माजलगाव येथे मसापाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आसारामजी लोमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
     मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगावच्या वतीने आयोजित १५ वे शिवार साहित्य संमेलन माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथे पत्रकार जगदीश पोपळे यांच्या शिवारात  यांच्या शेतात ना. धो. महानोर साहित्य नगरीत सकाळी ग्रंथदिंडी निघाली. ह.भ.प. रामराव महाराज फुलगे यांच्या हस्ते यावेळी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.पंधराव्या
शिवाय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजलगाव चे भूमिपुत्र प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक तथा पत्रकार आसाराम लोमटे, (परभणी) यांच्या हस्ते शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनपर भाषणात आसाराम लोमटे यांनी बोलताना सांगितले की, साहित्याची अनुभूती शब्द आणि पुस्तकामधून होते .समाजाला एका हारात गुंफण्याचे कार्य साहित्यिक करीत असतो.यावेळी शिवार साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष राही फपाळ, स्वागत अध्यक्ष जगदीश पोपळे,प्रख्यात कवी प्रभाकर साळेगांवकर,मसाप शाखा माजलगावचे पदाधिकारी यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
     कथाकथनाचे दुसरे सत्र संपन्न झाले.प्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर यांच्या बहारदार कथाकथनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामला चे कोषाध्यक्ष, कांतराव गाजरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. नंतरच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्रा. संगीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. संमेलनातील सहभागी कवी - 
प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे, रानबा गायकवाड, बा. सो. कांबळे यांच्या कवितांना रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.माजलगाव परिसरातील
भा. य. वाघमारे,  गोविंद गोचडे,  आत्माराम कुटे, विठ्ठल चव्हाण, गौरी सु. देशमुख, प्रतिभा थिगळे, सुरेखा कोकड, प्रेमा कुलकर्णी,दुर्गा राऊत, स्मिता लिमगावकर, स्मिता कोथाळकर, डॉ. मानसी देशमुख, गौरी अ.देशमुख, तेजश्री देशमुख, प्रा. रावसाहेब देशमुख, डॉ. अंगद गायकवाड, अतुल मुगळीकर, डॉ. ज्ञानेश्वर गवते,डॉ. सारंग कुलकर्णी, सखाराम जोशी, उध्दव विभुते, बालाप्रसाद चव्हाण, प्रकाश पत्की,कैलास सोळंके, मीना तौर,  अनुराधा खुर्पे, पद्माकर कातारे, केरबा शिंदे, संजय सपाटे, पुरूषोत्तम जाधव, अरूण देशमुख, दत्ता जाधव, वैभव सोळंके, भारत सोळंके, प्रवीण काळे, विशाल वायाळ, शिवराम होके, नंदकुमार कुलकर्णी, खेलबा काळे, रेश्मा आळणे, गीता सोळंके, शुभांगी
आनंदगावकर, अश्विनी वाकणकर, स्मिता आनंदगावकर, प्रा. अशोक टोळे, अशोक वाडेकर, डॉ. विठ्ठल वाघ, रामदीप डाके, ना. मा. पडलवार, प्रा. संजय बागुल, योगेश कानडे या कवींनी  उत्तम कविता सादर केल्या .कवी संमेलनाचे सूत्रसंचालन- मोहन राठोड, प्रमोद काळे तर आभार वैभव सोळंके यांनी मानले.
    संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ.
अनिलकुमार साळवे यांच्या उपस्थितीमध्ये व समारोप सत्राच्या प्रमुख पाहुण्या नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. वैशाली गोस्वामी यांच्या मनोगता नंतर राष्ट्रगीताने या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप झाला.शिवार साहित्य संमेलन साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्यासाठी मेजवानी ठरले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष जगदीश पोपळे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव चे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके, प्रा.स्नेहल पाठक (उपाध्यक्ष), प्रा. डॉ. भाऊसाहेब राठोड (कार्यवाह),किशोर गुंजकर (कोषाध्यक्ष), बाळासाहेब झोडगे (सहकार्यवाह ), प्रा. डॉ. उमेश साडेगावकर (सहकार्यवाह ) यांच्यासह कार्यकारणीने परिश्रम घेतले.शिवार साहित्य संमेलनाला छायाचित्रकार विठ्ठलराव झिलमेवाड यांचेसह साहित्यिक, श्रोते,विद्यार्थी, पत्रकार व परिसरातील रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने