नरेंद्र मोदीच्या खोट्या गॅरंटी जुमल्याला जनते समोर उघडे करण्यासाठी परळीत महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी
परळी प्रतिनिधी. परळी प्रतिनिधी लोकसभा निवडणुक पुर्व तयारी संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांची रविवार दि.10 मार्च रोजी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक संपन्न झाली.याबैठकीत लोकशाही विरोधी मोदी सरकारला सत्तेपासून दुर करण्यासाठी व बीड लोकसभेत महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणण्यासाठी परळीत महाविकास आघाडीची रणनिती व मोर्चा बांधणी करण्यात आली असून येत्या 12 मार्च रोजी अधिक व्यापक बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीच्या परळीत संपन्न झालेल्या व्यापक बैठकीत परळी विधान सभा मतदार संघातील गाव,वस्ती, तांडा तेथील बुथ निहाय बांधणी,नरेंद्र मोदीच्या खोट्या गॅरंटी जुमल्याला जनते समोर उघडे करून जनतेची जनजागृती
करणे,लोकशाही चा कसा गळा घोटला जात असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून उद्योग पत्त्यांचे कसे घरे भरले जातात हे ही मतदारांना समजून सांगणे, सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी या देशात सर्रासपणे चालू आहे.येणाऱ्या काळात लोकशाहीचा अंत करून पाहणाऱ्या हुकुमशाही आणणाऱ्या देश विघातक भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला कसे पाठबळ मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत विवरचना करण्यात आली.

या महत्वपूर्ण बैठकीसाठी परळी मतदारसंघातील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आप,कम्युनिस्ट,समाजवादी,माकप या व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती प्रामुख्याने या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे
नेते नारायण सातपुते,राजेश विभुते, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष अँड.जीवनराव देशमुख,शंकर शेजुळ माकपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक बी.जी.खाडे सर,अँड परमेश्र्वर गित्ते, आप पक्षाचे शहराध्यक्ष सतीश चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अँड. प्रकाश मुंडे, शशी चौधरी,सुभाष देशमुख,एतेशाम खतिब,वैजनाथ गडेकर,समंदर खान,दीपक शिरसाट,गुलाबराव देवकर, गित्ते, बद्दर भाई, ओबीसी अध्यक्ष रसूल खान युवक शहर अध्यक्ष अलीम भाई, सैय्यद अल्ताफ,बबलू सर्व काँग्रेस, मनोज केंद्र, मुंढे व्यंकटी, नाथ राव,मुंढे राजाभाऊ अदी मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा