छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास समोर येणे गरजेचे- चेतन निसर्गंध
परळी /प्रतिनिधी
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आयोजित स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले-आंबेडकरी अभ्यास समूहच्या वतीने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि ८ मार्च रोजी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा महासंघाचे परळी शहराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक नेते उत्तमदादा माने, कार्यक्रमाचे उदबोधक फुले-आंबेडकरी अभ्यासक चेतन निसर्गंध यांचेसह
ज्येष्ठ नेते उत्तम दादा माने,वंचीतचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,शिक्षक नेते ए. तू कराड , लक्ष्मण वैराळ, ज्येष्ठ संपादक रानबा गा
यकवाड, प्रा डॉ सिद्धार्थ तायडे,संतोष कोदरकर, अनंत इंगळे, संपादक नितीन ढाकणे , प्रा. डी. के. कुरुडे,जगदीश शिंदे, बंडू आमले, सेवा सहकारी सोसायटी मिरवटचे चेअरमन हनुमंत इंगळे,बाबा शेख, सय्यद अफसर , महेश मुंडे, आकाश देवरे,अमोल सूर्यवंशी, चंद्रशेखर देशमुख आदींची विशेष उपस्थिती होती.
यकवाड, प्रा डॉ सिद्धार्थ तायडे,संतोष कोदरकर, अनंत इंगळे, संपादक नितीन ढाकणे , प्रा. डी. के. कुरुडे,जगदीश शिंदे, बंडू आमले, सेवा सहकारी सोसायटी मिरवटचे चेअरमन हनुमंत इंगळे,बाबा शेख, सय्यद अफसर , महेश मुंडे, आकाश देवरे,अमोल सूर्यवंशी, चंद्रशेखर देशमुख आदींची विशेष उपस्थिती होती.
विवेकशील आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्रचित्रण समजून घेताना कार्यक्रमाचे उदबोधक चेतन
निसर्गंध आपले विचार मांडताना म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास मांडला तोच इतिहास सद्यस्थितीमध्ये समाजाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. जोतीराव फुले यांनी शिवचरित्र लिहिल्यानंतर तथाकथित लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र लिहिण्याचा स्पर्धा लागली होती. ब्रिटिश लेखिका रोसालिंड ओ'हॅनलॉन (Rosalind O' Hanlon) यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन म.फुल्यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत असे प्रतिपादनही त्यांनी केले. कुणबी,मराठा,हिंदू शब्दांची उत्पत्ती इत्यादी बाबीवर सखोल ऐतिहासिक संदर्भ देऊन माहिती देण्यात आली.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे यांनी जिजाऊ वंदना घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अजय गंडले यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा