लोकसभा निवडणुकीत परळी तालुक्यात मराठा समाज पूर्ण ताकदीने प्रत्येक गावातून उमेदवार देणार

लोकसभा निवडणुकीत परळी तालुक्यात मराठा समाज पूर्ण ताकदीने प्रत्येक गावातून उमेदवार देणार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
 तालुक्यातील कौडगाव(हुडा)येथे सकल मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी समाजहिताचे अनेक ठराव घेण्यात आले त्यामध्ये 
 सकल मराठा समाज प्रत्येक गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने कमीत कमी दोन उमेदवार लोकसभेसाठी देण्यात येणार, त्यांचा खर्च गावातील सर्व मराठा समाज करणार, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कुठल्याही राजकीय स्टेजवर समाजातील व्यक्तींनी जाऊ नये, मराठा समाजाच्या वतीने कोणीही राजकीय पक्षाचा बूथ एजंट किंवा प्रचारक होणार नाही, आरक्षण आंदोलना दरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल प्रशासनाला जबाब विचारणे, आरक्षणाच्या यापुढील लढ्यामध्ये महिलांचाही सहभाग असणार, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा शब्द अंतिम असेल, मोडी लिपी तज्ञ
जगताप साहेब यांचा अभिनंदनचा ठराव, मराठा समाजात आपापसातील मतभेद दूर करून समाजाचे होणारे खच्चीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न, एकमेकांबद्दल आदरभाव ठेवावा, एखाद्याला टार्गेट होत असेल तर समाजाने त्याव्यक्तीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे रहावे, आपापल्या कामातील थोडा वेळ समाजासाठी आवर्जून द्यावा,शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करावी, कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी  समाज बांधवांना वेळोवेळी मदत करावी, समाजात कायम समन्वय ठेवण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार, अंबाजोगाई व परळी कोर्टात गुन्ह्यांच्या संदर्भातील कामकाज मराठा समाजाचे वकील बांधव विनामूल्य करणार, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा परळी वैजनाथ येथे घेण्यात येणार यासह समाजहिताचे बरेच ठराव या महत्वपूर्ण बैठकी दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वानुमते पास करण्यात आले.
यावेळी परळी शहरासह तालुक्यातून समजबांधव 
बहुसंख्येने आले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने