बन्सल क्लासेसचे विज्ञान प्रदर्शन संपन्न
परळी प्रतिनिधी.
बन्सल क्लासेस माधव बाग, परळी च्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक विभागाचे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनात सोलार सिस्टीम, ड्रोन, ऍसिडिक आणि बेसिक केमिकल्स, शेतीउपयोगी तंत्र-यंत्र, मायक्रोस्कोप, कार्बईड गन, टाकाऊ वस्तूपासून विट, टेसला कॉईल, टाकाऊ पाणी उपयोगी करणे -फिल्ट्रेशन,सोलार कार, स्मार्ट सिटी विथ एनर्जी इफिसीएन्ट, इलक्ट्रिक बेल, होलोग्राम, इलक्ट्रिक वॉटर कलर, ब्लुटूथ स्पीकर, रिमोट कंट्रोल कार, टरबाईन, रेन वॉटर हार्वेस्टिंग
, रूफ वॉटर हार्वेस्टिंग, वायरलेस पावर, ट्रान्सफर सिस्टीम, ब्लुटूथ कनेक्टेड स्पीकर या प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक, शिक्षक उपस्थित होते.
, रूफ वॉटर हार्वेस्टिंग, वायरलेस पावर, ट्रान्सफर सिस्टीम, ब्लुटूथ कनेक्टेड स्पीकर या प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक, शिक्षक उपस्थित होते.
या प्रदर्शनात इयत्ता सहावी तील कृष्णा फडकरी-" ब्लुटूथ कनेक्टेड स्पीकर "ने प्रथम क्रमांक पटकवला.तर दुसऱ्या क्रमांक साठी पाच प्रदर्शनास समान गुण देण्यात आले. यांत धनश्री, अक्षदा, स्नेहल, मानशी, हमाउद्दीन,यतार्थ, गीतांश, आरुष, अथर्व यांचे प्रदर्शन क्रमांक दोन वर निवडण्यात आले.क्रमांक तीन वर श्रीराम, अथर्व, संग्राम, हंसराज, पवन,प्रथमेश, मधुर, लौकिक यांचे प्रदर्शन निवडण्यात आले.
पूजा मॅडम, अपराजिता मॅडम व कराड ए. तु. यांनी निरीक्षक म्हणून काम केले.ब्रँच मॅनेजर विनोद सरांनी सर्वांचे कौतुक केले. सर्व बॅच कॉर्डिंनेटर ने यासाठी मेहनत केली.


टिप्पणी पोस्ट करा