मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेचे गणित बिघडवणार काय?
कुणाला बसणार फटका याची चर्चा सुरू
परळी ( रानबा गायकवाड ) राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर सुद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना ते आरक्षण मान्य नाही .त्यामुळे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे .मराठा समाजाचे हे उमेदवार लोकसभेचे गणित बिघडणार काय ? तसेच या उमेदवारीमुळे कोणत्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना फटका बसणार याची सर्वसामान्य नागरिकातून चर्चा सुरू आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे .दरम्यान राज्य सरकारने स्वतंत्र मागासवर्गीय आयोग नियुक्त करून घरोघरी जाऊन सर्व्हे केला.. व मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले .परंतु या आरक्षणाव
र मराठा समाज समाधानी नसल्याचे दिसत आहे.
र मराठा समाज समाधानी नसल्याचे दिसत आहे.
ओबीसीतूनच आरक्षण हवे तसेच सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे .तसेच सरकार या मागण्या मान्य करीत नाही म्हणून मराठा समाजाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सरकारच्या धोरणा विरोधात मराठा समाजाचे उमेदवार मोठ्या संख्येने उभे करण्याचे ठरवले आहे .बीड येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचे समाजाच्या वतीने निश्चित केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत जर या ठरलेल्या नितीनुसार मराठा समाजाचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा परिणाम ईव्हीएम मतदान यंत्रणेवर होणार आहे. निवडणुका या बॅलेट पेपर वरच घ्याव्या लागतील .तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या भूमिकेचा कोणत्या राजकीय पक्षाला फटका बसणार. हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे .तर कोणत्या राजकीय पक्षांना मदत होईल की मराठा समाजाचे उमेदवार निवडून येतील हे आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत स्पष्ट होईल. त्यासाठी मात्र लोकसभा निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा