आगामी लोकसभा निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठी - बाळासाहेब आंबेडकर

आगामी लोकसभा निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठी - बाळासाहेब आंबेडकर

लोकशाही वाचविण्यासाठी भाजपाला पराभूत करा 

नवी मुंबई.       येणारी आगामी लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करावे असे आवहान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले .ते नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्ता परिवर्तन महासभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
     यावेळी बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला.आगामी लोकसभा निवडणूक ही या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी आहे.संविधान वाचविण्यासाठी आहे.आणि प्रत्येक नागरिकाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आहे.असे ते म्हणाले.
     नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही तर गुजरातचे पंतप्रधान वाटतात असा खोचकटोल आहे त्यांनी लगावला .प्रत्येक गोष्ट गुजरातला हलवत आहेत .विदेशातील प्रधानमंत्री अथवा राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले की दिल्ली सोडून गुजरातला घेऊन जातात .येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनतेने जर भाजपला मतदान केले तर महाराष्ट्रात एकही कारखाना शिल्लक राहणार नाही .त्यामुळे आता भाजपाला पराभूत करावेच लागेल असेही बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.
    दरम्यान या सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने