रयत शिक्षण संस्थेच्या रा .ब .काळे जीवन शिक्षण मंदिर शाळेचे 7 मार्च रोजी शून्य खर्चाचे आदर्श स्नेहसंमेलन

रयत शिक्षण संस्थेच्या रा .ब .काळे जीवन शिक्षण मंदिर शाळेचे 7 मार्च रोजी शून्य खर्चाचे आदर्श स्नेहसंमेलन

सातारा.     शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रोपटे लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील रा .ब .काळे जीवन शिक्षण मंदिर या शाळेचे 7 मार्च रोजी एक आदर्श स्नेह संमेलन पार पडणार असून या स्नेह संमेलनाची सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होत आहे.
     याविषयी अधिक माहिती अशी की ,थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातारा येथे मंगळवार पेठेतील धननीच्या बागेत सर्वसामान्य ,गोरगरीब ,अपेक्षित बहुजन मुलांना शिक्षण मिळावे म्हणून छत्रपती शाहू बोर्डिंग व त्याबरोबरच रा. ब .काळे जीवन शिक्षण मंदिर या शाळेची सुरुवात केली .आज रयत शिक्षण संस्थेच्या हजारो शाळा आणि महाविद्यालये महाराष्ट्रात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
     मंगळवार पेठेत असणाऱ्या या रा. ब .काळे जीवन शिक्षण मंदिर शाळेत 7 मार्च रोजी दुपारी एक वाजता शाळेचे स्नेहसंमेलन होणार आहे .या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचे कोरिओग्राफीचे काम शाळेचे माजी विद्यार्थी ,शिक्षक ,पालक आणि स्वतः विद्यार्थ्यांनीच केले आहे
.     ड्रेपरीवर होणारा        प्रती विद्यार्थी लागणारा 500  रुपये खर्चही शाळेने वाचविला आहे .त्यामुळे  दीड लाख रुपयांच्या जवळ बचत होणार आहे. पालकांनाही कोणताही खर्च सोसावा लागणार नाही.
    बहुतेक शाळां मधून होणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये निवडक विद्यार्थ्यांनाच आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते .परंतु या स्नेहसंमेलनात शाळेतील 281 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवणार आहे .ही एक ऐतिहासिक बाब म्हणावी लागेल .आणि स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणूनही शाळेचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत .अशा अनोख्या आणि आदर्शवत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शून्य खर्चाच्या होणाऱ्या स्नेहसंमेलनास पालकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अमोल कोळेकर सर व सर्व शिक्षक वृदांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने