पालकमंत्री साहेब ,परळीत क्रीडा संकुलासह चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण,मुलभूत दर्जेदार सुविधा पुरवा- बहादूरभाई

पालकमंत्री साहेब ,परळीत क्रीडा संकुलासह चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण,मुलभूत दर्जेदार सुविधा पुरवा-  बहादूरभाई

परळी प्रतिनिधी
    बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर,औष्णिक विद्युत केंद्र,आडत व्यापार आदी बाजारपेठेमुळे रोजगारातून उत्पन्न करून देणारी परळीची ओळख मराठवाड्यात होती. परंतु खऱ्या अर्थाने परळीची ती ओळख धुसर झाली असून पालकमंत्री साहेब क्रिकेट साठी क्रीडा संकुल तर आपण बांधाच पण युवकांना उच्चशिक्षण ,रोजगार ,झालेली कामे दर्जेदार करून परळीची ती ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब प्रयत्न करतील का असा सवाल परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बहादूर भाई यां
नी केला आहे.
   जवाहर एज्युकेशन सोसायटी मार्फत वैद्यनाथ कॉलेजची आपल्या पूर्वजांनी निर्मिती करून आपल्या विद्यार्थ्यांना येथेच चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून यशस्वी प्रयत्न केलेले आपण पाहिले .परंतु आज त्याच संस्थेची किंवा इतर शहरातील नामवंत विद्यालयांची काय स्थिती आहे आपण पाहत आहोत. आपल्या भागातील हजारो विद्यार्थी लातूर औरंगाबाद आदी शहरांकडे शिक्षणासाठी जात असल्याचे आपण पाहत आहोत. पालकमंत्री साहेब वीस पंचवीस वर्षांपूर्वीच शैक्षणिक वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे आम्हाला वाटते. आपल्या भागातल्या बेरोजगारांना रोजगार करण्यासाठी कुठलीही यंत्रणा आपल्या भागात नसल्यामुळे अधिकाधिक बेरोजगार युवक देशोधडीला लागत आहेत. जयंती व इतर उत्सवाला लाखोचा निधी दिला जातो यातून तो युवक नाचगाण्यापलीकडे काही करू शकत नाही हेही आपण पाहत आहोत.     
    अल्पसंख्यांकासाठी नुसत्याच इमारती बांधल्या परंतु त्यासाठी कुठलीही योजना राबवल्या गेली जात नाही. डॉ.भालचंद्र वाचनालय गेली कित्येक वर्षापासून बांधकामाच्या नावाखाली ते अपूर्ण आहे पूर्णत्वास कधी येणार आणि वाचकांना कधी उपलब्ध होणार असेच जर कामे चालली तर कशी चालेल शहराची शैक्षणिक चळवळ असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री साहेब क्रीडा संकुलनात बरोबर परळी शहरातील व परळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मेडिकल शिक्षण आधी उच्च शिक्षण घेता यावं यासाठी आपण प्रयत्न करायला हवा जेणेकरून परळीच गेलेले शैक्षणिक वैभव पुन्हा मिळवता येईल का? परळीकरांना मनसोक्त मोकळा श्वास घ्यावा म्हटलं तर जिजामाता उद्यान तेही कंप्लेंट नाही.सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकमेव असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर याकडेही आधुनिक सुविधेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो.
   बीड जिल्ह्यात रस्त्यासाठी जेवढा निधी नसेल तेवढा निधी परळी शहरातील रस्त्यांना आला परंतु ते रस्ते दर्जेदार झालेत का, भुयारी गटार योजनेची  काय परिस्थिती आहे .याबाबत वेगळे काही सांगायची गरज नाही. परळी शहरातील छोटे मोठे गुत्तेदारांना हाताला काम नाही कारण बाहेरून आलेले गुत्तेदारच शहरात निकृष्ट दर्जाचे काम करून करोडो रुपये कमवत आहेत .परंतु परळीच्या गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर मजूर मजुरांच्या हाताला काम मिळत नाही नेमके असे का होते यावर कोणी बोलतही नाही. खरंच बाहेरून आणलेल्या गुत्तेदारांच्या या झालेल्या उत्कृष्ट कामाचे ऑडिट केलंच तर सगळं पितळ उघड होईल असेही बहादूरभाई यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने