सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्याच्या गाई गेल्या चोरीस ,पोलिसांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ

सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्याच्या गाई गेल्या चोरीस ,पोलिसांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ

सोनपेठ प्रतिनिधी

   सोनपेठ सिरसाळा हायवेवर शेतकऱ्यांच्या शेतातील दोन गाई काल मध्यरात्री चोरी गेल्याची घटना घडली असून दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सोनपेठ पोलीस स्टेशनला शेतकरी गेला असता गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांकडून केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्याकडून होत आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,रामेश्वर प्रभू दातार यांच्या दोन गाईंची रात्री 12:00 ते 2:00 च्या सुमारास चोरी. रामेश्वर प्रभू दातार हे सोनपेठ शिरसाळा हायवे जवळ एक एकर शेती व चहा व रसवंतीचा छोटासा व्यवसाय आहे .ते त्याच ठिकाणी निवास करतात . तसेच ते दोन दोन गाईंचा सांभाळ करतात. रात्री रामेश्वर प्रभू दातार  गाई तिथेच घराच्या बाहेर बांधून ठेवतात. मध्य
रात्री अंधाराचा फायदा घेऊन  चोरट्यांनी 12:00 ते 2:00 च्या सुमारास गाईला बांधलेला दोर कापून दोन्ही गाई चोरून नेल्या.
    रामेश्वर प्रभू दातार हे पोलिसात तक्रार द्यायला गेले असता पोलिसांकडून तुम्ही कुठे होतात, गाई ओरडल्या नाहीत का ? या पद्धतीने शेतकऱ्यास प्रश्न विचारण्यास सुरुवात केली व तक्रार दाखल करायची असल्यास त्या गाईंचा दाखला घेऊन या पुन्हा बघुत.असे म्हणत त्यांना वापस पाठविले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने