इंडिया घटक पक्षाचे कार्यकर्ते वन बुथ टेन युथ निहाय लागणार लोकसभेच्या तयारीला
परळी प्रतिनिधी परळीत I.N.D.I.A घटक पक्षाच्या सर्व नेते,पदाधिकारी सर्व सेल, फ्रंट प्रमुखांची गुरुवारी दुसऱ्यांदा बैठक संपन्न झाली.इंडिया घटक पक्षाचे कार्यकर्ते वन बुथ टेन युथ निहाय लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सज्ज करण्यासाठी जोमाने तयारी
ला लागणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी या बैठकीत सांगितले.
ला लागणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी या बैठकीत सांगितले.
बीड लोकसभेत I.N.D.I.A घटक पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी पुर्व नियोजना संदर्भात परळी विधान सभा मतदार संघातील प्रमुख नेते,पदाधिकारी कार्यकर्त्यांची दुसऱ्यांदा व्यापक बैठकीचे आयोजन गुरुवार दि.14 मार्च रोजी पॉवर हाऊस पाठीमागील उर्दू शाळेच्या पटांगणात करण्यात आले होते.
बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अँड.जिवनराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले असुन भाजपा आणि त्यांच्या सोबत असलेल्या फुटीर पक्षाच्या उमेदवारांना धुळ चारण्यासाठी परळी विधान सभा मतदारसंघातील जनता आतुर झाली आहे.बेरोजगारी,महागाई प्रचंड प्रमाणात भाजप सरकारने वाढवून जनतेला कंगाल केले आहे.मोदी, शहाच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी,सीबीआय मार्फत धमक्या दिल्या जात असुन हे काय सर्व सामान्याना जनतेला आवडणारे नाही शिवाय विकासाच्या केवळ घोषणाबाजी करुन जनतेची दिशाभूल करत असणाऱ्या मोदी सरकार योग्य धडा शिकवण्यासाठी जनता जागृत झाली आहे हे व असे मुद्दे घेऊन परळी विधान सभा मतदार संघातील वन बुथ टेन युथ निहाय बैठका घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले आहे .
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नारायण सातपुते,राजेश विभुते,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जीवनराव देशमुख शंकर शेजुळ, माकपाचे प्राध्यापक बी.जी. खाडे सर,अँड. परमेश्र्वर गित्ते,सतीश चौधरी, अँड. प्रकाश मुंढे, शशी चौधरी ,सुभाष देशमुख,
मेहबूब कुरेशी, फिरोज पठाण, रणजित देशमुख,एतेशाम खतिब,वैजनाथ गडेकर,समंदर खान,दीपक शिरसाट,गुलाबराव देवकर, गित्ते, बद्दार भाई, ओबीसी अध्यक्ष रसूल खान युवक शहर अध्यक्ष अलीम भाई, सैय्यद अल्ताफ,बबलू सर्व काँग्रेस, मनोज केंद्र, मुंढे व्यंकटी नाथ राव,मुंढे राजाभाऊ अदी I.N.D.I.A घटक पक्षाच्या सर्व नेते,पदाधिकारी सर्व सेल, फ्रंट प्रमुखांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा