विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डीजे विरहीत मिरवणूक निघणार
परळी प्रतिनिधी. विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आदर्श सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल रोजी परळी शहरातून भव्य अशी डीजे विरहित मिरवणूक काढण्यात येणार आहे .तसेच विविध वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
याबाबत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या वतीने नुकतीच रेल्वे स्टेशन येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात बैठक संपन्न झाली .या बैठकीत डॉल्बी मुळे मिरवणुकीत वयोवृद्धांना तसेच विविध गंभीर स्वरूपाचे हृदयाचे आजार असणाऱ्या नागरिकांना सहभागी होता येत नाही . तसेच डिजेवर अनावश्यक होणारा खर्च टाळण्यासाठी डीजे विरहित मिरवणूक काढण्याचे ठ
रले.
रले.
14 एप्रिल रोजी भिमनगर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून सकाळी भव्य रथातून वाजत गाजत, लेझीम पथक, बॅन्ड पथकासह ही मिरवणूक सुरुवात होणार असून गणेशपार , राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, मार्केट कमिटी मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात पोहचेल समारोप प्रसंगी भव्य महावंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .याबरोबरच विविध विचारवंतांचे व्याख्याने ,तरुणांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आदीचे नियोजन करण्यात येणार आहे .याकरिता सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा