परळी तालुक्यात बंजारा समाजाच्या तांड्यावर 70 ते 80 जणांच्या जमावाचा हल्ला, अनेक जण गंभीर जख्मी

परळी तालुक्यात बंजारा समाजाच्या तांड्यावर 70 ते 80 जणांच्या जमावाचा हल्ला, अनेक जण गंभीर जख्मी 

परळी प्रतिनिधी.    तालुक्यातील सिरसाळा पासून जवळच असलेल्या करेवाडी येथील महादेव तांडा येथे राहणाऱ्या बंजारा समाजावर 70 ते 80 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना काल दिनांक 25 मार्च धुळवडीच्या दिवशी घडली आहे.या हल्ल्यात अनेक महिला व पुरुष गंभीर जख्मी झाले आहेत.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यां यशोदाताई राठोड यांनी जख्मींची परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असताना भेट दिली.
    याबाबत अधिक माहिती अशी की,काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 70 ते 80 जणांच्या जमावाने अचानक महादेव तांड्यावर हल्ला केला.दगडफेक केली.तसेच घरांची नासधुस करीत दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.महिलांनाही या मारहाणीत मोठा मार लागला आहे.हल्ला करणारे जमावातील अनेक जण दारूच्या नषेत बेधुंद होते असे जख्मींनी सांगितले.
    या हल्यात सुंदर बाबुलाल राठोड, बळीराम शंकर राठोड, अशोक महादेव
राठोड यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर रणजित राठोड, रमेश राठोड,पापा राठोड यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.जख्मी बंजारा समाजावर अन्याय झाल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जख्मींची विचारपूस केली.या प्रसंगी शिवसेनेच्या कार्यकर्त्यां यशोदाताई राठोड याही उपस्थित होत्या.
     दरम्यान घटना घडून एक दिवस झाला तरी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने