बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र स्टार प्रचारक पदी डाॅ. अनंत गायकवाड यांची निवड
परळी प्रतिनिधी. 2024 देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुका मध्ये बहुजन समाज पार्टी ने देशभरात स्टार प्रचारकाची यादी घोषित करण्यात आली असून बसपाचे राज्यसचिव डॉ . अनंत गायकवाड यांची स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
स्टार प्रचारकांची यादीमधे बी .एस .पी .च्या राष्ट्रीय अध्यक्षा उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री तथा माजी राज्यसभा सांसद बहन कु.मायावतीजी यांच्यासह चाळीस स्टार प्रचारकांची टीम यामधे प्रमुख आनंद जी साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष ,नॅशनल काॅर्डीटनेर आकाश आनंद, महाराष्ट्र
मुख्य प्रभारी मा. खा.रामजी गौतम ,प्रभारी नितीन सिंग ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड.परमेश्वर गोणारे, प्रदेश महासचिव तथा मुख्य मराठवाडा प्रभारी मा.मनीषभाऊ कावळे, यांच्यासह परळी बसपा चे निष्ठावंत कार्यकर्त तथा बीड लोकसभा अध्यक्ष डाॅ.अनंत गायकवाड यांची महाराष्ट्र स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली .

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होत आहेत .त्यामधे पाचही टप्प्यासाठी स्टार प्रचारक राहतील .या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा