जयंती उत्सव समितींनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काही निधी राखीव ठेवावा - रानबा गायकवाड कॅनडात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या सुरभीचा संपादक बालासाहेब जगतकर यांच्या वतीने रोख5000 रक्कम देऊन केला सत्कार

जयंती उत्सव समितींनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काही निधी राखीव ठेवावा - रानबा गायकवाड

कॅनडात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या सुरभीचा  संपादक बालासाहेब जगतकर यांच्या वतीने रोख5000 रक्कम देऊन केला सत्कार



परळी प्रतिनिधी.    शिक्षण हे सर्व विकासाचा मूळ पाया आहे .महामानव ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि ज्ञानाच्या बळावरच भारतात क्रांती केली .त्यामुळे डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या मंडळांनी काही निधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राखून ठेवावा असे आवाहन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले.ते कॅनडा येथे मानसशास्त्र विषयांसाठी निवड झालेल्या सुरभी संजय जगतकर हिचा भीमनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.तक्षशिला सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरभीला रोख पाच हजार रूपये आर्थिक मदत करून तिचा सत्कार करण्यात आला.
      शहरातील भीमनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रत्येक रविवारी बौद्ध वंदना संघाच्या वतीने सामुदायिक वंदनेचा कार्यक्रम संपन्न होत असतो.रविवार दिनांक 30 रोजी याच कार्यक्रमात कॅनडा येथे उच्च शिक्षणासाठी जाणा -या कुमारी सुरभी संजय जगतकर हिचा सत्कार प्रा .डॉ .यशश्री बालासाहेब जगतकर ,रमा प्रेम जगतकर व रंभाताई बालासाहेब जगतकर व तक्षशिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांच्या च्या हस्ते पेन ,पुस्तक गुच्छ व पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमास प्रा.विलास रोडे,भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा प्रजावतीताई कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सोपानराव ताटे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे , डॉ .स्वप्नील म्हाळंगीकर  यांनी सुरभीच्या
पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी कुमारी सुरभी संजय जगतकर हिने  आपल्या भावना व्यक्त केल्या .डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिकले पाहिजे असे प्रतिपादन केले. मनोगत व्यक्त करताना तिने मराठी आणि इंग्रजी भाषेत उपस्थितांशी संवाद साधला.
   यावेळी मिलिंद बनसोडे ,दौलत हनवते , शंकरराव साळवे ,उत्तम समुद्रे ,भारत  ताटे , प्रा .विलास रोडे ,राजाभाऊ जगतकर ,वसंत बनसोडे ,अशोक जगतकर राहुल घोबाळे, डॉ.सिद्धार्थ जगतकर ,विशाल बनसोडे ,रमेश जगतकर ,आनंद जगतकर ,मधुकर जोगदंड ,राजाभाऊ साळवे ,प्रकाश अण्णा जगतकर ,गौतम समिंदरसवळे ,प्रशांत जगतकर ,चेतन ताटे ,आनंद ताटे ,महेंद्र ताटे ,दर्शन ताटे ,भानुदास जंगले ,राघु ताटे ,समाधान भिसे ,मुकुंद जगतकर ,विनोद रोडे ,भीमा कसबे यांच्या सह भीम नगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    या कार्यक्रमात,भारत ताटे यांनी  2500  रुपये तर शिरीष जगतकर ,उत्तम समुद्रे यांनी1000  हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सिद्धार्थ जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रेम जगतकर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने