राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर फुलचंद कराड यांचे परळीत जल्लोषात स्वागत बीड जिल्ह्यात शरदचंद्र पवार यांची ताकद दाखवुन देवु-फुलचंद कराड

राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर फुलचंद कराड यांचे परळीत जल्लोषात स्वागत 

बीड जिल्ह्यात शरदचंद्र पवार यांची ताकद दाखवुन देवु-फुलचंद कराड

परळी (प्रतिनिधी)
 भाजपा जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) मध्ये मुंबई येथे प्रवेश केल्यानंतर परळी शहरात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर बोलताना सांगितले की,या लोकसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची बीड जिल्ह्यातील ताकद दाखवुन देवु असे सांगितले.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर जेष्ठ नेते फुलचंद कराड हे परळी शहरात प्रथमच दाखल झाल्यानंतर शनिवार दि.30 मार्च रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कराड समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत वंदन केले.यावेळी फुलचंद कराड तुम आगे बढो,शरदचंद्र पवारसाहेब जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाचा अभिषेक केला व नंतर हजरत उमरशाह वली दर्गाह येथे चादर अर्पण केली.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फुलचंद कराड म्हणाले की,मला भाजपात काम करु दिले जात नव्हते,मागील दहा वर्षात मला साधे महामंडळही मिळु दिले नाही उलट पक्षाचे पद काढुन कुचंबणा केली.यामुळे मी राष्ट्रवा
दी कॉंग्रेस शरद पवार या पक्षात आपल्या समर्थकांसह जाहिर प्रवेश केला.या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे बीड लोकसभेसाठी जो उमेदवार देतील तो निवडुन आणत बीड जिल्ह्यात शरद पवार साहेबांची ताकद दाखवुन देवु असे सांगितले.फुलचंद कराड यांच्या  सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख,रमेश ढाकणे,कुरेशी मेहबूब,माऊली फड, रवी कराड,गोविंद मुंडे,विश्वनाथ मुंडे, इंद्रमोहन मुंडे,विजय बडे,प्रशांत कराड,मंचक मुंडे,वैजनाथ राठोड,प्रकाश राठोड,बाळासाहेब कराड,रमेश चव्हाण,वैजनाथ कराड, सोपान कराड,भागवत नागरगोजे, राम कराड,बबन जाधव,गणेश मुंडे, विकास राठोड,संदीप कराड आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने