घरकूलासाठी 10 हजाराची लाच घेणारा पोलिसांच्या जाळ्यात

घरकूलासाठी 10 हजाराची लाच घेणारा पोलिसांच्या जाळ्यात 



     प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देतो असे म्हणून10 हजार रुपयाचे लाच घेणारा लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला आहे.. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रधानमंत्री योजनेचे घरकुल मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शेख हुसेन शेख बद्दु (37, कुन्हाड बु.।।, ता. पाचोरा) यास जळगाव एसीबीने आज दिनांक 19 मार्च मंगळवारी सायंकाळी अटक केली.

    कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील 34 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी शेख हुसेन यांनी आपली पाचोरा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याने तुम्हाला  आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करून देतो.


मात्र त्यासाठी मला दहा हजार रुपये लाच स्वरुपात द्यावे लागतील, अशी मागणी 11 मार्च रोजी केली. 
   तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी हुसेन शेख यांनी कुऱ्हाड गावात लाचेची रक्कम स्वीकारण्याचे कबूल करताच सापळा रचण्यात आला व त्यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

    आरोपीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, चालक हवालदार सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने