शाळेस पुस्तके भेट देऊन अर्णव उजगरेने साजरा केला वाढदिवस
पाथरी ( प्रतिनिधी ) आपण ज्या शाळेत शिक्षण घेतो त्याच शाळेत वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तके भेट देऊन अनोख्या पध्दतीने अर्णव लक्ष्मण उजगरे या विद्यार्थ्यांने वाढदिवस साजरा केला. त्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पञकार लक्ष्मण उजगरे यांचा मुलगा अर्णवचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्याने आपल्या शाळेस पुस्तके भेट दिली.
यावेळी मुख्याध्यापक अजित खारकर सर,अंभुरे सर,कदम सर,पानझाडे मॅडम,अशोक डांबे सर व अर्णवचे पालक पञकार लक्ष्मण उजगरे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा