तहसील आंदोलनप्रकरणी काँग्रेसच्या शहराधरक्षासह दहा जणांना अटक
खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
परळी ( प्रतिनिधी ) गेली सहा महिने पाठपुरावा करूनही रेशनकार्ड डाटा एन्ट्री होत नसल्याच्या कारणावरून परळी तहसील कार्यालयात बेशरम फेक केल्याच्या कारणामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यातील शहराध्यक्ष बहादूरभाई यांच्यासह दहा जणांना शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान परळी न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
परळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे एकाच पक्षाचे काम करतात असा आरोप पञकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी केला होता. याच मुद्द्यावर मंगळवारी नायब तहसीलदार रूपनर यांच्या दालनात बेशरम घेऊन जाऊन आंदोलन करण्यात आले. सदर कार्यकर्त्यांवर कलम 353 अन्वये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
आज परळी शहर पोलीसांनी दहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व दहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. याच प्रश्नावर सकाळीच परळी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी राजेसाहेब देशमुख यांनी खोटा गुन्हा मागे घ्यावा तसेच 1557 रेशनकार्ड डाटा एन्ट्री करून द्यावी अन्यथा जिल्हाभर आंदोलन
करण्याचा इशारा दिला.
करण्याचा इशारा दिला.
लेखणीबंद आंदोलन
नायब तहसीलदार रूपनर यांच्या अंगावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेशरम फेक केल्याचा आरोप करीत महसूल कर्मचाऱ्यांकडून आज लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. मार्च एन्डचे कारण सांगत खुद्द तहसीलदार यांच्यासह अनेक कर्मचारी कामात मग्न दिसले.
टिप्पणी पोस्ट करा