महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेसचे नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, ( प्रतिनिधी..)
महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केला होता. आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. दरम्यान शासनाने कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहराध्यक्ष बहादूरभाई यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात असा आरोप पत्रकार परिषदेत काॅंग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी दोन दिवसा
पूर्वी केला होता.परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामांची महसुलच्या अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात येते असे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी म्हटले होते.

आज दि.२९ रोजी काँग्रेस पदाधिकारी यांनी आक्रमक होत आंदोलन केले.थेट नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात प्रवेश करत निषेध व्यक्त केला.त्याचप्रमाणे नायब तहसीलदार यांना बेशरम दर्शवत व दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. पक्षपातीपणा व सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबून टाकणार्या प्रशासनाच्या बेशरम फेकीत कार्यकर्त्यांनी निषेध केला असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी काॅंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर कलम 353, 141 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा