तीस पस्तीस जणांना मार लागलेला हाच तो खड्डा, आणखी किती?
परळी ( प्रतिनिधी ) येथील सिध्दार्थ नगर पाटीसमोरील दडगे यांच्या हाॅटेलसमोरील मोंढा मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध भल्ला मोठा खड्डा पडला असून आता पर्यंत तीस ते पस्तीस जण या खड्यात पडल्याने त्यांना मार लागला आहे हा खड्डा आणखी किती जणांना मार खावा लागणार?
हा भल्ला मोठा खड्डा दडगे टी समोरील नालीवर पडला आहे. नाल्यावरील ढापा फुटल्याने लोखंडी गज उघडे पडले आहेत. ते गज सरळ वर उभे राहिले आहेत. या खड्ड्यात मोटरसायकल वरून पडून आतापर्यंत तीस ते पस्तीस ज
णांना गंभीर मार लागला आहे.
णांना गंभीर मार लागला आहे.
मार लागणे तसे मोटरसायकल, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. कित्येकांचे मोबाईल ,जीवनावश्यक वस्तू, बाजार साहित्य या खड्ड्याने गिळल्या आहेत. कुणी माणूस गिळू नये म्हणजे झाले. विशेष म्हणजे हा खड्डा राञी नागरिकांना दिसत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांसाठीही धोकादायक आहे.
सदर खड्डा मुख्य रहदारीच्या रस्त्यावर पडला असून तो लवकर दुरूस्त केला नाही तर छोट्या मोठ्या अपघातांच्या संख्येत नक्कीच वाढ होऊ शकते.
किमान शतक पूर्ण व्हावे याची वाट पहात असतील...
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा