बौद्धिक क्षमता ह्या भाषिक आणि गणितीय क्षमता विकसनाच्या अगोदर विकसित व्हाव्या लागतात--ए तु कराड


बौद्धिक क्षमता ह्या भाषिक आणि  गणितीय क्षमता विकसनाच्या अगोदर विकसित व्हाव्या लागतात--ए तु कराड
 परळी  ( प्रतिनिधी )                       25मार्च रोजी कन्या नागापूर चे शाळा पूर्व एक दिवसीय प्रशिक्षण जि प प्रा शा डाबी येथे पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रप्रमुख ए. तु. कराड हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत शेरकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून कवडेवार डी वी ,व निकते सर होते.
प्रथम ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन क
रण्यात आले.

       तज्ञ मार्गदर्शक भारत शेरकर यांनी शाळा पूर्व तयारी प्रशिक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, सामाजिक क्षमता, भाषिक क्षमता आणि गणितीय क्षमता प्राप्त झाल्या किंवा नाही हे कसे ओळखावे ते
सर्व शिक्षकांना समजून सांगितले.
विविध टेबल मांडून विद्यार्थी प्रथम अवस्थेत शाळेत येताना जड अंतकरणाने येतो, म्हणून मातांचे विविध खेळ घेतले पाहिजे असं सांगितले. ज्या मुळे विद्यार्थी तणावमुक्त होईल. शाळेने वातावरण निर्मिती करावी. आनंद मेळाव्या प्रमाणे नूतन विद्यार्थ्यांना शाळा ही आपली घरापेक्षा भारी आहे असे वाटावे.
कोविड19मुळे जी आपल्यात मरगळ आलेली आहे ती दूर करून कामास लागा असा सल्ला त्यांनी दिला. दुसऱ्या प्रशिक्षणापर्यंत आपण सर्वांनी आनंदी वातावरणात येऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.
        या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाजन किरण यांनी केले.
याप्रसंगी माधुरी मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना ए तु कराड म्हणाले की,प्रत्येक शिक्षकांनी बाल मानस शास्त्र अभ्यासले आहे, अनुभवले आहे. त्यामुळे मूल हे आनंदी मनाने शाळेत कसे येईल ते पहावे. शाळेने नियोजन करावे. जाहिराती कराव्यात. माता मेळावे घ्यावेत. सर्व मातांनी मूल शाळेत घालताना शाळा हे खेळणे, नाचणे, बागड न्याचे ठिकाण असल्याचे बिंबवावे. असे सांगितले. दुसऱ्या सत्रात महिलांनी विविध मूल कसे रममाण करावे यासंबधी नाटय सादर केले.
शेवटीं आभार प्रदर्शन ह भ प तुकाराम महाराज पदमपल्ले यांनी मानले.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने