पगार शासनाचा काम राष्ट्रवादीचे
राशनचा मुद्दा राष्ट्रवादीने हायजॅक केला - बहादूरभाई
परळीत आघाडीत बिघाडी
परळी ( प्रतिनिधी परळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पगार शासनाचा घेतात पण काम फक्त राष्ट्रवादीचे करतात असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई यांनी आज दिनांक 25 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत केला. गेली सहा महिने काँग्रेस गोरगरिबांना रेशनकार्ड व धान्य मिळावे म्हणून काम करीत आहे. पण राष्ट्रवादीकडून हा मुद्दा हायजॅक केल्याचेही ते म्हणाले. दरम्यान राज्याच्या सत्तेवर असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत बिघाडी तर झाली नाही ना असेही काँग्रेसच्या पञकार परिषदेवरून दिसत आहे.
शहर काँग्रेस कार्यालयात आज शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता काँग्रेसची पञकार परिषद झाली. यावेळी बोलतांना शहराध्यक्ष बहादूरभाई म्हणाले की, गेली सहा महिन्यापासून काँग्रेस पक्ष शहरातील ज्या गोरगरिबांना रेशनकार्ड नाही. तसेच रेशनकार्ड असून धान्य मिळत नाही यासाठी प्रयत्न करीत आहे. अद्यावत माहिती गोळा करून त्यांचा डाटा परळी तहसील कार्यालया
त दिली.
त दिली.
परंतू तहसील कार्यालयातील अधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी हे डाटाएन्ट्री होत नाही. नेटच चलत नाही. साईट बंद आहे असे कारणे देऊन काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आम्ही सहा महिने झटत आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसात निवेदन दिले त्यावर कारवाई करीत परळी तहसील कार्यालय कॅम्पचे आयोजन करते. याचा अर्थ परळी तहसीलचे अधिकारी व कर्मचारी हे पगार राज्य शासनाचा घेतात पण काम एकाच पक्षाचे करतात असा आरोप केला.
दरम्यान तहसील कार्यालयातील अशा अधिकारी व कर्मचारी यांचा बेशरमाची झाडे देऊन सत्कार करणार असल्याचेही बहादूरभाई म्हणाले. या पञकार परिषदेस शिवाजी देशमुख, गणपत अप्पा कोरे, दिपक सिरसाट, शशीशेखर चौधरी,अशोक कांबळे, खलील, रणजित देशमुख, धर्मराज, समंदरखा पठाण, सुभाषराव देशमुख आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा