क्रिकेट प्रेमी ना.धनंजय मुंडे
क्रिकेट हा भारतत सध्या तरी सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारतावर सुमारे दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला क्रिकेटची पंढरी समजली जाते. पण भारताने क्रिकेटच्या बाबतीत केंव्हाच मागे टाकले आहे. मग तो कसोटी सामना असो अथवा एकदिवसीय वा ट्वेन्टी ट्वेन्टी. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे सुध्दा नुसते क्रिकेट प्रेमीच नाहीत तर उत्कृष्ट खेळाडू सुध्दा आहेत.
राजकारण आणि समाजकारण करोत असताना त्यांना जेंव्हा जेंव्हा थोडीशी उसंत मिळते तेंव्हा ते परळीत मैदानावर दिसतात. मिञांसोबत मनसोक्त क्रिकेटचा आनंद घेतात. परळी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे देशपातळीवर गाजत होती. पण शहरात क्रिडा क्षेत्रात अनुकूल वातावरण नव्हते ते निर्माण करण्याचे काम ना. धनंजय मुंडे यांनी स्वामी विवेकानंद क्रिडा मंडळाची स्थापना करून केले.
स्वामी विवेकानंद क्रिडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी परळी शहरात व परिसरातील तरुणांना संधी मिळावी म्हणून बॅडमिंटन, वहॅलिबाॅल, कबड्डी आदिचया राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या. तर क्रिकेटच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित करून बीड जिल्हा नाही तर मराठवाडा क्रिकेटमय करून टाकला.
1995 मध्ये गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राचे उपमुखयमंञी होते. 12 डिसेंबर हा साहेबांचा वाढदिवस. या निममीताने ना. धनंजय मुंडे यांनी स्वामी विवेकानंद क्रिडा मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ज्याने भारताला 1983 चा विश्वचषक भारताला जिंकून दिला तो कपिलदेव, माजी कर्णधार महमंद अझरुद्दीन, फटकेबाजी आणि लांबलचक सिक्सर मारणारा अतुल बेदाडे, ऑलराऊंडर राॅबीनसिंग, करसन घावरी, आंतरराष्ट्रीय पंच पिल्लू रिपोर्टर आदि क्रिकेट खेळाडू या निममीताने
परळीकरांना पहाता आले.
परळीकरांना पहाता आले.
केवळ क्रिकेट खेळाडूच नाही तर मराठी आणि हिंदी सिनेमा जगातील अनेक दिग्गज कलाकारांनी परळीत हजेरी लावली .गोविंदा, आदित्य पांचोली, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी शहाणे यांनी परळीकरांना मोहित केले.
या स्पर्धेत एम.के.परसाद, अमित दाणी अतुल रानडे, यांच्यासह मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, गुजरात, कर्नाटक, हैदराबाद, मध्यप्रदेश, हरियाणा राज्यातील रणजी करंडक क्रिकेट खेळाडू परळी शहरात खेळलेले आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी बीड, परभणी, नांदेड, लातूर येथून क्रिकेट रसिक येत असत.
या स्पर्धेच्या निमित्ताने ना. धनंजय मुंडे यांनी स्थानिक खेळाडूंना संधी निर्माण करुन दिली. याचा परिणाम म्हणजे विनायक निरमळे हा अंडर 19 महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार होता. तर सचिन सुर्यवंशी, किरण पारधे हे विद्यापीठ खेळाडू म्हणून गाजले. याचे श्रेय ना. धनंजय मुंडे यानांच जाते.
परळी शहरातील शकतीकुंज वसाहतीतील मैदानावर या स्पर्धा पार पडायच्या. महाराष्ट्राचे नामवंत कोच राम हिरापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची विकेट बनवली जात असे. परळी शहरातील जुने प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू ओम मेनकुदळे, अविनाश गवळी, दिवंगत पापा देशपांडे, अजय जोशी, रवी कुलकर्णी हे दिवस रात्र स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्यायचे.
अनेक स्थानिक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहचले. त्यांना वेळोवेळी लागणारी मदत ना. धनंजय मुंडे यांनी केली. हे सातत्य आजही पुढे त्यांचे बंधू आणि बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी ठेवले आहे. ते परळीत डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने. मैदानावर चौफेर चौकार आणि षटकार मारणारे धनंजय मुंडे राजकारणातही मागे नाहीत. अशा अष्टपैलू ना. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
रानबा गायकवाड
9420148538
💪💪💪💪👍👍👍
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा