ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रमाचा शुभारंभ-चंदुलाल बियाणी
पीपीई किट, सॅनिटायझर, औषधी -गोळ्यांचे वाटप
परळी (प्रतिनिधी-)
राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा परळी न.प.चे नगरसेवक चंदुलाल बियाणी यांच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत आज वाढदिवसाचे औचित्य साधून पीपीई किट, रोग प्रतिकार शक्ती वाढविणारी व आयुष मंत्रालय भारत सरकारने निर्देशीत केलेल्या औषधी व गोळ्या तसेच सॅनिटायझर, मास्क आदींचे आज वितरण करण्यात आले. याचसोबत शहरात कंटेन्टमेन्ट झोन मध्ये बॅरिकेटस् लावण्यात आल्या. आज उत्साहपुर्ण वातावरणात या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी हा आगळा-वेगळा आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे.
राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष, जिहा नियोजन समितीचे सदस्य तथा न.प.सदस्य चंदुलाल बियाणी व आरोग्य मित्र परळीच्या वतीने आज विविध आरोग्य विषयक उपक्रम हाती घेण्यात आले. राज्यभरात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असून या पार्श्वभुमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्देशीत केलेल्या होमिओपॅथीक आर्सैनिक-30 गोळ्या व लिक्वीड औषध आदींचे गरजूंना वितरण करण्यात आले. सुमारे 15 हजार कुटूंबांना या औषधी व गोळ्या वितरीत करण्यात येत असून चंदुलाल बियाणी यांच्या गुरुकृपा नगर येथील संपर्क कार्यालयात गरजूंना नियमीतपणे औषधी व गोळ्या यांचे वाटप होणार आहे.
ना.धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रमांतर्गत डॉक्टर्स, न.प. कर्मचारी, पोस्टमन, अन्नछत्रमधील सेवाभावी कर्मचारी, पेपर विक्रेते, घरपोच पंक्चर काढण्याची सुविधा देणार्या व्यक्तींना आज पीपीई किट वितरीत करण्यात आले. यावेळी चंदुलाल बियाणी यांच्यासह अॅड. जिवनराव देशमुख, न.प.स्वच्छता समितीचे सभापती किशोर पारधे, शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख,देवराव कदम, सुभाष वाघमारे, संतोष रोडे, सतिश बंग, संपादक प्रकाश सुर्यकर, बालकिशन सोनी, लक्ष्मण वाकडे, धिरज जंगले, धनंजय आरबुने, विश्वास महाराज पांडे, प्रशांत प्र.जोशी आदी उपस्थित होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या 51 व्यक्तींना यावेळी किट चे वितरण करण्यात आले.
बॅरिकेटस् बसविले
परळी शहरातील 17 प्रतिबंधीत क्षेत्र नगर परिषदेने सिल केेले आहेत. यासाठी चंदुलाल बियाणी यांच्या वतीने पत्रे व बॅरिकेटींगचे साहित्य न.प.ला देण्यात आले. न.प.ने प्रतिबंधीत क्षेत्रांना सिल करण्यासाठी बियाणी यांनी सुचना केली होती.
टिप्पणी पोस्ट करा