प्लाझ्मा दान करून प्रशांत जोशी यांनी दिली ना. धनंजय मुंडे यांना अनोखी भेट
परळी (प्रतिनिधी ) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी ना. धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जाहीर कार्यक्रम घेऊन साजरा करू नये असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी आज प्लाझ्मा दान करून ना. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
प्रशांत जोशी यांनी आज अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात आपला प्लाझ्मा दान केला. याचा उपयोग इतर कोरोना पॉझिटिव्ह रुगण बरे होण्यास होणार आहे. ना. धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा विळखा पडला आहे. राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.
प्रशांत जोशी यांनी प्लाझ्मा दान करून धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त भेट तर दिलीच आहे त्याबरोबर आपले सामाजिक व राष्ट्रीय कार्य पार पाडले आहे. या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा