रस्त्यावरील गतीरोधकाने घेतला चार मुलांच्या आईचा बळी परळी सिरसाळा मार्गावर अनेक गतीरोधक

रस्त्यावरील गतीरोधकाने घेतला चार मुलांच्या आईचा बळी 

परळी सिरसाळा मार्गावर अनेक गतीरोधक 


परळी प्रतिनिधी.      परळी सिरसाळा मार्गावर असलेल्या गतीरोधकावर मोटरसायकल आदळल्याने एका चार मुलांच्या आईचा बळी घेतल्याची दुःखद घटना नुकतीच घडली आहे.दरम्यान परळी सिरसाळा मार्गावर अनेक गतीरोधक आहेत यापैकी किती अधिकृत व किती अनधिकृत असा सवाल आता उपस्थित होत आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, सिरसाळा येथील या घटनेत मृत्यू झालेल्या सुजाता सुरेश किरवले, वय 32 वर्ष या त्यांच्या मुलीला घेऊन परळीला दवाखान्यात येत होत्या.मोटरसायकलवर पती व मुलगी मध्यभागी बसलेली होती. दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 ते 4:30 दरम्यान त्यांची गाडी  तळेगाव रस्त्यावर असलेल्या गतिरोधकवर आदळली या अपघातात सुजाता किरवले यांना डोक्याला गंभीर मार लागला.
      अपघात घडल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई व नंतर लातुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्या वाचू शकल्या नाहीत.त्यांच्या पश्चात  तीन मुली एक मुलगा,पती,सासू  असा परिवार आहे. त्यांची पार्थिवावर काल सिरसाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रस्तयावरील गतीरोधकाने एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे.यास कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने