श्री. चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट परळी व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्यावतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न
डॉ.प्रतीक्षा कांदे व डॉ. सागर समगे यांची
रुग्णसेवा
परळी प्रतिनिधी. श्री. चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट परळी वैजनाथ फाउंडेशन स्कूल परळी व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात शेकडो रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी डॉ.प्रतीक्षा सौदागर कांदे व डॉ.सागर समागे यांनी केली. आवश्यक रुग्णांना ऑपरेशन साठी लागलीच उदगीर येथे नेण्यात आले.
शहरातील फाउंडेशन स्कूल येथे काल दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता या नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चिंतामणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष विजय प्रकाश तोतला हे होते तर शिबिराचे उद्घाटन डॉ. खंदारे यांनी केले. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. एल लखोटिया, डॉ. रवी तोतला, डॉ. रितू तोतला प्राचार्य गजानन नागझरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात सुमारे 400 ते 500 नागरिकांनी आपले डोळे तपासले. ज्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे अशा रुग्णांना स्वतंत्र बस मार्फत उदगीर येथील उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात नेण्यात आले. या यशस्वी उपक्रमाबद्दल श्री चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट व फाउंडेशन स्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा