काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बहादूर भाईं व पदाधिकाऱ्याच्या मागणीला यश; परळीसह बीडमध्ये दुष्काळ जाहीर

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बहादूर भाईं व पदाधिकाऱ्याच्या मागणीला यश; परळीसह बीडमध्ये दुष्काळ जाहीर




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
       परळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष हनिफ करीम सय्यद उर्फ बहादूर भाई व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, आज राज्य सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथसह सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पायाला दुखापत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत पिकांची पाहणी केली.
         काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदित्यदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या सूचनेनुसार हनिफ करीम सय्यद उर्फ बहादूर यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. बीड जिल्हा व परळी वैजनाथ तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष हनिफ करीम सय्यद उर्फ बहादूर भाई यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. पायाला दुखापत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. पाणीटंचाई, वाढता शेती खर्च आणि कर्जाचा भार यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत, पंचनामे व पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बहादूर भाई, ॲड. अनिल मुंडे, ॲड. शशिशेखर चौधरी, सुभाष देशमुख, रणजित देशमुख, बाळासाहेब गित्ते, रसूल खान, गुलाबराव देवकर, वैजनाथ गडेकर, अप्पासाहेब नागरगोजे, शेख बबलू, शेख बाबा, नगरसेवक बबू, शेख सदाम तसेच शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
          दरम्यान, आज राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असून, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथसह सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बहादूर भाई यांनी केलेल्या दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला यश आले असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया हनिफ करीम सय्यद उर्फ बहादूर भाई यांनी दिली.


*पायाला दुखापत असतानाही शेतकऱ्यांसाठी बहादूर भाई पोहचले बांधावर*

स्वतःच्या पायाला दुखापत असतानाही हनिफ करीम सय्यद उर्फ बहादूर भाई यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत थेट बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांमध्ये जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने