महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ बीड जिल्ह्याच्या वतीने शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ बीड जिल्ह्याच्या वतीने शिक्षक दिनी जिल्हाधिकारी 
कार्यालयावर  मुक मोर्चा 


बीड(प्रतिनिधी).      ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व नंतर १००%अनुदानावर आलेल्या शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन लागु करावी या मुख्य मागणीसाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांना निवेदन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने शांततेत व तोंडाला काळे मास्क लाऊन मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या मार्गदर्शनाखाली हा मुक मोर्चा काढण्यात आला होता. 
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास अतिशय शांततेत व कुठलीही घोषणा किंवा काही न बोलता तोंडाला काळे मास्क लावून सुरुवात करण्यात आली. मा.जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथील प्रांगणात सर्वप्रथम निवेदनाचे वाचन व मुकमोर्चाच्या आयोजनाबाबतची माहिती बालासाहेब इंगळे यांनी केले व रीतसर निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब,बीड यांचे प्रतिनिधी  यांना देण्यात आले.
    यावेळी जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व नंतर १००% अनुदानावर आलेले शालेय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. राज्य समन्वय संघाचे पदाधिकारी सुनील भोर सर .संजय वाळे सर(अहिल्यानगर) . बाबा पाटील सर,दत्ता पाटील सर (कोल्हापूर) सचिन नलावडे सर(सातारा)यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन बीड जिल्ह्यातील राज्य समन्वयक . बालासाहेब इंगळे सर,प्रा जितेंद्र भालेकर सर,प्रा.बशीर सय्यद सर,.संजय इंगळे सर,.चंद्रकांत गायकवाड सर,.व्यंकट घुले सर,श्री.मधुकर घुगे सर, बीड जिल्हा समन्वयक श्री.सचिन पवार सर व श्री.बाळासाहेब साळवे सर (बीड तालुका)श्री. बाळासाहेब काकडे सर व तात्याराव जेवे सर (आष्टी तालुका)प्रा.नामदेव चांगण सर व श्री.नासेर इनामदार सर (पाटोदा तालुका) श्री.भास्कर सानप सर व श्री.संजय काकडे सर (शिरूर कासार तालुका)श्री.कालिदास पांढरे सर व श्रीमती शुभांगी धाराशिवकर मॅडम(गेवराई तालुका)श्री.अशोक इंगवले सर व श्री. तात्याराव खोटे सर(माजलगाव तालुका)श्री.बन्सी पवार सर व श्री.विनायक मुंजे सर(अंबाजोगाई तालुका)श्री.राजाभाऊ राठोड सर व श्री. श्रीहरी दहिफळे सर(परळी तालुका)श्री.दिनेश घोळवे सर व श्री.बाबासाहेब चोले सर(वडवणी तालुका)श्री.सतीश ढोबळे सर व श्री. धोंडीराम नागरगोजे सर(केज तालुका)श्रीमती वर्षा गुळवे मॅडम व श्री.दयानंद सावळे सर(धारूर तालुका)व सर्व पेन्शन पीडित बंधु भगिनी यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने