कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी राहुल पोटभरे तर तालुका अध्यक्षपदी दिलिप भालेराव यांची निवड
परळी प्रतिनिधी. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी राहुल पोटभरे यांची तर परळी तालुका अध्यक्षपदी दिलिप भालेराव यांची नुकतीच निवड करण्यात आली.
बीड येथे झालेल्या बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांनी राहुल पोटभरे व दिलीप भालेराव यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.बीड जिल्ह्यातील कर्मचारी व त्यांच्या प्रश्नांवर, अन्याय अत्याचार झाल्यानंतर संवैधानिक मार्गाने ते प्रश्न सोडविण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व परळी तालुका अध्यक्षांनी काम करावे अशी अपेक्षा याप्रसंगी बालासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली.
निवडीनंतर बोलतांना बीड जिल्हा अध्यक्ष राहुल पोटभरे व परळी तालुका अध्यक्ष दिलीप भालेराव यांनी आमच्यावर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पेलली जाईल असे काम करण्याचे आश्वासन दिले.बैठकीला बीड जिल्ह्यातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार दिपक गायकवाड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा