डॉ.प्रकाश उजगरे व अँड.दिलिप उजगरे यांना पितृशोक
संभाजीराव उजगरे यांचे निधन, सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार
परळी प्रतिनिधी. प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ प्रकाश उजगरे व शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट दिलीप उजगरे यांचे वडील संभाजीराव काशीनाथ उजगरे यांचे नुकतेच आज पहाटे वृध्पकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता भीम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.
संभाजीराव उजगरे हे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ प्रकाश उजगरे व एडव्होकेट दिलीप उजगरे यांचे वडील आहेत.आंबेडकरी चळवळीतही त्यांचे योगदान होते.त्यांचा आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील राहत्या घरी वृध्पकाळाने दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता भीम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात 3 भाऊ,4 बहिणी,सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा