अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उद्या परळीत निर्भय मॉर्निंग वॉक

  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उद्या परळीत निर्भय मॉर्निंग वॉक 



परळी प्रतिनिधी.         अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या शहीद दिनानिमित्त उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी परळीत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाखा परळीच्या वतीने देण्यात आली आहे.

     2013 मध्ये डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात धर्मांधांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.या घटनेला 20 ऑगस्ट रोजी 13 वर्षे पूर्ण होत आहेत.यानिम्मीताने त्यांना अभिवादन करण्यासाठी व खुनाचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी 7 वा.राणीलक्ष्मीबाई टावर ते मोंढा मार्केट, एक मिनार चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल.

तरी अंनिसच्या पदाधिकारी, सभासद व हितचिंतकांनी या मॉर्निंग वॉक मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने