बाबासाहेबांना प्रत्येक घरात नेण्याचे काम महाकवी वामनदादा कर्डक यांनी केले - महापौर सय्यद इक्बाल अभिरा फाउंडेशनचे महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण

बाबासाहेबांना प्रत्येक घरात नेण्याचे काम महाकवी  वामनदादा कर्डक यांनी केले - महापौर सय्यद इक्बाल 


अभिरा फाउंडेशनचे महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण 


परभणी (प्रतिनिधी)         
      महामानव विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक घरात नेण्याचे काम महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी केले.बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश वामनदादांनी जीवंत ठेवला असे प्रतिपादन परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांनी केले.ते अभिरा फाउंडेशन परभणी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते.
       परभणी येथील बी.रघुनाथ सभागृहात आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा कार्याध्यक्ष संजयभाऊ कांबळे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परभणीचे महापौर सय्यद इकबाल हे होते. याप्रसंगी नागेशदादा सोनपसारे, स्वागताध्यक्ष नगरसेवक मिलिंद बामणीकर, गौतम मुंडे ,प्राध्यापक राजेश रणखांबे, यशवंत भैय्या भालेराव, डॉ.रामप्रसाद खंदारे, डॉ. सुनील कीर्तिकर बुरांडे, नगरसेवक आकाश लहाने, नगरसेवक अविनाश अवचार, दीपक वारकरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.केले.
           यावेळी उद्घाटन पर बोलतांना संजयभाऊ कांबळे  म्हणाले की,बाबासाहेबांनी सांगितलेले वामनदादांनी घराघरात पोहचवले,वामनदादांनी कधी बाबासाहेब सोडले नाहीत.दुस-याच्या स्टेजवर कधीच गेले नाहीत.संविधान वाचले तर सगळेच वाचणार आहेत.समाजाचा विश्वास आता शाहिरांवरच शिल्लक राहिला आहे.प्रास्ताविक करताना भदन्त मुदितानंद थेरो यांनी सांगितले की,सातत्याने 18 वर्षं महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करीत आहोत.पुढे पुरस्कारांचे वितरण सुरू झाले.धनदांडग्याच्या विरोधात पहिले बंड वामनदादांनी पुकारले.दादांनी सिनेमातही गाणी लिहली. वामनदांनी बाबासाहेब समाजात रुजवले. वामनदादांच्या गीतात विद्रोह आहे.कलावंताचे मुक्त विद्यापीठ म्हणजे वामनदादा होत. यावेळी सामाजिक ,शैक्षणिक व धम्म चळवळीत  कार्य करणारे माजलगावचे सदाशिव भालेराव ,परळीचे अजयकुमार गंडले, नांदेडचे शाहीर माधव वाढवे, मुख्याध्यापक संभाजी खिल्लारे, परभणी,व अशोक कांबळे यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
       कार्यक्रमास मराठवाड्यातील गीतकार, शाहीर, गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिरा फाउंडेशनचे  मार्गदर्शक भदंत मुदितानंद थेरो, तसेच अभिरा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कांबळे भगवान वाघमारे, शिवाजी सुगंधे, पद्माकर वायफळ, शेषराव जलारे, प्रकाश सपाटे, आकाश इंगोले सुनील लहाने, शुभम अवचार व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी केले. सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी परिश्रम घेतले.केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कलाकार, महिला व पुरुष उपस्थित होते.
   दरम्यान या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून आलेल्या शाहीर व गायकांनी वामनदादा कर्डक यांची गीते सादर केली. प्रत्येक गीताला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने