स्वातंत्र्य दिनी परळी उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांचा अवमान
पायात बुट घालुन प्रतिमांना केले अभिवादन
परळी ( प्रतिनिधी ) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांचा अवमान झाल्याची घटना घडली आहे.महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पायात बुट घालुन प्रतिमांना अभिवादन केल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.अभिवादन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 15 ऑगस्ट रोजी परळी उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा आणि सेवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिष्टाचाराचे पालन न करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना अनेक कर्मचाऱ्यांनी पायात बोट घातलेला होता हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय कार्यालयात मोठे महत्त्व असताना प्रतिमांना अभिवादन करण्याच्या प्रसंगी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायातील बूट काढले नसल्याच्या आरोपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून, दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी परळी शहरातील आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकारामागे कोणती जातीय मानसिकता होती का? याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.तसेच, चौकशीअंती कायदेशीरदृष्ट्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करण्यास पात्र बाब आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान स्वातंत्र्य दिन हा देशाच्या लोकशाही मूल्यांचा आणि संविधानिक विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय कार्यक्रमात महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करताना सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक शिष्टाचार व आदराचे पालन करणे गरजेचे आहे. या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा