बुद्धांचा धम्म जगाच्या कल्याणासाठीच - रंजना मस्के बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनास प्रारंभ

बुद्धांचा धम्म जगाच्या कल्याणासाठीच - रंजना मस्के 

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनास प्रारंभ 


परळी प्रतिनिधी.    तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा जगाच्या कल्याणासाठीच असुन त्यामुळेच शांती,समता, बंधुता व न्याय यावर आधारलेला धम्म बाबासाहेबांनी स्विकारला असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या परळी तालुका  सरचिटणीस रंजना मस्के यांनी केले.त्या वर्षावासानिम्मीत बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन प्रारंभ करतांना बोलत होत्या.या कार्यक्रमाचे उद्घाटन वाघमारेताई यांनी केले.
    शहरातील शिवाजीनगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात भिमाई महिला मंडळाच्या वतीने काल आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाच्या निमित्ताने महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथवाचनाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच त्यापूर्वी परळी येथे येत्या 10 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याविषयी बैठक संपन्न झाली.
   ग्रंथ वाचनाचा शुभारंभ रंजना मस्के यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचून करण्यात आला.याप्रसंगी निर्मला आचार्य,विशाखा घाडगे,प्रमिला ढोके,सुषमा सरवदे,झिंझुर्डेताई, बनसोडे ताई,गायकवाड ताई,ढवळे ताई,व्हावळेबाई,उषा वडमारे,जगताप ताई, आचार्य ताई,आदी बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने