आरक्षण उपवर्रगीकरण विरोधी समितीच्या वतीने
राजु थाटे यांच्यावरील भ्याड हल्याचा जाहीर निषेध
10 ऑगस्ट रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणार भव्य मोर्चा
परळी प्रतिनिधी. अनुसूचित जाती मध्ये उपवर्गकरणाच्या नावाखाली फूट पाडण्याचा राज्य सरकारच्या निषेधार्थ 10 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाची तयारी संदर्भात भव्य बैठक नुकतीच परळीत संपन्न झाली. या बैठकीत भीमराज सेनेचे अध्यक्ष राजू थाटे यांच्यावर ठाण्यात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यावर पुणे येथे दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आली.
येत्या 10 ऑगस्ट रोजी परळीत उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे या व इतर प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दिनांक 19 जुलै रोजी व्ही.आय.पी.शासकीय रेस्ट हाऊसमध्ये सकाळी 11 वाजता बैठक संपन्न झाली.या भव्य मोर्चात अनुसूचित जातीतील 59 जातींच्या हजारो प्रतिनिधी, आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी होणार आहेत.मोर्चाच्या तयारीसाठी यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांनी आपल्या भुमिका मांडल्या.
तसेच यावेळी ठाणे येथे भीमराज सेनेचे अध्यक्ष राजू थाटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा ठराव समितीच्या वतीने घेण्यात आला. तसेच या हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. बैठकीस परळी शहर व तालुक्यातील अनुसूचित जातीतील नेते कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा