आ.धनंजय मुंडे यांनी विधानसभेत नशेखोरी विरुद्ध प्रशन उपस्थित केल्यानंतरही परळीत गुटखा,मटका अवैध दारू तेजीत

आ.धनंजय मुंडे यांनी विधानसभेत नशेखोरी विरुद्ध प्रशन उपस्थित केल्यानंतरही परळीत गुटखा,मटका अवैध दारू तेजीत 


परळी प्रतिनिधी   परळी शहरात मागील महिन्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि तोहिदखान हत्येप्रकरणी विधानसभेत बीड जिल्ह्यातील एकूणच वाढलेल्या नशेखोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतरही परळीत मात्र सर्रास अवैध गुटखा ,मटका आणि अवैध दारू तेजीत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
        मुंबई येथे चालु असलेल्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतेच बीड जिल्हृयात वाढलेल्या नशेखोरीवर सवाल उपस्थित केला होता.परळी शहरातही मागील महिन्यात हत्या, मारामारी यांच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून आले.अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून शहरातील गुटखा माफियांमध्ये दहशत पसरली आहे.परंतु काही दिवसांनंतर पुन्हा शहरात गुटखा माफियांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे.
   शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुटखा, मटका याबरोबरच अवैध दारू आदी धंद्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.परळी शहरात दोन पोलिस स्टेशन आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन परळी तालुक्यात कार्यरत आहेत .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने