दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांची व्ही.के.कलर होमला सदिच्छा भेट
परळी प्रतिनिधी. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र व सामान्य जनांचा बुलंद आवाज दैनिक वृतरत्न सम्राटचे संपादक कुणाल कांबळे यांनी नुकतीच परळीतील प्रसिद्ध व्ही.के.कलर होमला सदिच्छा भेट दिली.बहुजन समाजाच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चे उद्योग व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन केले.
काल दिनांक 28 जून रोजी संपादक कुणाल कांबळे हे सम्राट वाचक मेळाव्यसाठी परळीत आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी परळी शहरातील विविध कंपन्यांच्या रंगासाठी प्रसिद्ध असलेले विनोद कांबळे, विशाल कांबळे बंधुच्या जुन्या कोर्टासमोर असलेल्या व्ही.के.कलर होमला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख प्रा.प्रदीप रोडे,प्रा.दासू वाघमारे, जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, प्राचार्य दुष्यांत कटारे, साहित्यिक अजयकुमार गंडले, पत्रकार भगवान साकसमुद्रे,महादेव रोडे, व्ही.के.कलर होमचे संचालक विनोद कांबळे,विशाल कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी विनोद कांबळे यांनी संपादक कुणाल कांबळे यांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा