इंटकचे महासचिव दत्तात्रय गुट्टे यांचा एप्रिल मध्ये दिल्लीत मानद डॉक्टरेट पदवीने होणार सन्मान


 इंटकचे महासचिव दत्तात्रय गुट्टे यांचा एप्रिल मध्ये दिल्लीत मानद डॉक्टरेट पदवीने होणार सन्मान 


परळी (प्रतिनिधी. ) इंटकचे  महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष  तथा महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटकचे महासचिव दत्तात्रय दादाराव गुट्टे यांचा 17 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे मानद डॉक्टरेट पदवीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे त्यांना जाहीर झालेल्या या डॉक्टरेट बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
      दत्तात्रय गुट्टे यांच्या सामाजिक कार्याची व कामगार चळवळीतील योगदानाची  दखल घेऊन विश्व संस्कृती एवं पर्यावरण संरक्षण आयोग नवी दिल्ली या संस्थेने दखल घेऊन त्यांना विद्यावाचस्पती (मानद डॉक्टरेट) जाहीर केली आहे.हा सन्मान सोहळा 17 एप्रिल 2026  रोजी प्रधानमंत्री संग्रहालय,तीन मुर्ती मार्ग, नवी दिल्ली येथे पदवीदान समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
   या होत असलेल्या अतिशय मानाच्या सन्मानाबद्दल दत्तात्रेय गुट्टे यांचे परळी सह महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व मित्र परिवाराकडून आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने