महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी परळी तहसीलवर धरणे आंदोलन संपन्न

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या 
मागणीसाठी परळी तहसीलवर धरणे आंदोलन संपन्न



परळी(प्रतिनिधी):-   बिहार राज्यातील बुद्ध गया येथे असणारे व जगातील बौद्धाचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान असणारे महाबोधी महाविहार याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौध्दांना देण्यात यावे तसेच बी.टी अॅक्ट 1949 रद्द करावे या प्रमुख मागण्यासाठी आज परळी तहसिल कार्यालयावर बौद्धजन संघर्ष समिती, परळी च्या वतीने धरणे आंदोलन दुपारी12 ते 1 या वेळेत करण्यात आले.
       प्रथम या धरणे आंदोलनाचे प्रस्ताविक प्रा विलास रोडे यांनी केले, त्यानंतर जोरदार घोषणांनी पूर्ण तहसिल परिसर दणाणून गेला. बीटी अॅक्ट रद्द करा, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशा घोषणा देव्यात आल्या. या धरणे आंदोलनात प्रा दासू वाघमारे, भास्कर नाना रोडे, डॉ सिध्दार्थ जगतकर, वैजनाथ तात्या जगतकर, पंडित झिंझुर्डे, मिलिंद घाडगे, दिलीपभाउ जोशी, बाबासाहेब पाचांगे, महेंद्र शिंदे, मझर खान इ.नी विचार मांडले
     यानंतर मा. तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनावर भारत कसबे, अशोक जोगदंड,अर्जुन शिंदे, भास्कर गाडे, सुहास ताटे, दिलीप भोसले, अशोक वाघमारे, अमोल न. रोडे, भालचंद्र ताटे, प्रा दशरथ रोडे, अकुंश मुंडे, सी.पी खंडागळे, प्रशांत रोडे,भिमराव गोदाम इ. च्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने