भारतीय बौद्ध महासभेच्या महिला कार्यकारिणीची निवड ८ मार्चला
परळी, दि. ___ : तमाम बौद्धांची मातृसंस्था असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने परळी तालुका व शहर शाखेच्या महिला कार्यकारिणीची निवड रविवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी १२.०० वाजता मिलिंद नगर येथील नालंदा बौद्ध विहार येथे होणार आहे.
महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. परळी तालुका, शहर तसेच ग्रामीण भागातील निष्ठावान व श्रद्धावान बौद्ध उपासिका यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन माजी शहर अध्यक्षा आयुनी प्रजावतीताई कांबळे यांनी केले आहे.
या बैठकीत तालुका व शहर शाखेच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असून निवड समिती आयुनी. कमल ताई डोंगरे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्षा महिला जिल्हा बिड पूर्व. व त्यांची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तेव्हा परळी परिसरातील सर्व बौद्ध उपासिका यांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा