महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी ए. तु. कराड यांची निवड
परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी ए.तु.कराड यांची नुकतीच निवड करण्यात आली.परळी येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष बाबुराव नागरगोजे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून या संघटनेचे जिल्हा सचिव अंकुश पवार, संघटक महादेव दाभाडे,व आव्हाड सर हे उपस्थित होते. राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष म्हणून ए .तु.कराड यांची निवड केलेले पत्र दिले. तर त्यांच्या रिक्त स्थानी परळी तालुका अध्यक्ष म्हणून सूर्यवंशी राजाभाऊ यांची निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये पेन्शनर्स कर्मचाऱ्यांचे पेन्शन वेळेवर मिळावे या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. नंदागौळ गावचे गीते सर हे पेन्शनर 90 वर्षे वय झालेले असून 80 वर्षानंतर त्यांच्या पेन्शनमध्ये कसलाही फरक झालेला नाही. त्यामुळे अशा बऱ्याच पेन्शनर्स चे प्रश्न या तालुक्यात असून संघटनेने सर्वांच्या सेवा पुस्तिका अद्यायावत करण्याचे ठरविलेले आहे. पेन्शन आदेशाप्रमाणे सर्वांना पेन्शन मिळते की नाही हे सेवा पुस्तके ची पडताळणी करून घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
संघटनेचे सर्वांनी सभासद व्हावे अशी विनंती बीड जिल्हा अध्यक्ष बाबुराव नागरगोजे यांनी केली. पेन्शन प्रस्ताव पाठवत असताना एक प्रत स्वतःकडे शेवटपर्यंत असावी, पेन्शन प्रस्ताव हा सेवेत असे असेपर्यंत सहा महिने अगोदर पाठविण्यात यावा. पेन्शन ऑर्डर ही सेवा समाप्तीच्या दिवशी हातात असावी अशा प्रकारचे मार्गदर्शन जिल्हा सचिव अंकुश पवार यांनी केले. नुकतीच पुणे येथे राज्य कार्यकारणीची बैठक झाली, या बैठकीचा वृत्तांत येतो कराड सर यांनी या बैठकीत मांडला. ही संघटना राज्यभर असून या संघटनेची पकड मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धती यामुळे या संघटनेचे जाळे सर्वत्र पसरलेले दिसून येते. या संघटनेने अनेकांचे प्रश्न सोडविलेले असून आपली ही काही पेंडिंग प्रश्न असतील तर ते तात्काळ सोडविण्यासाठी संघटनेकडे लेखी निवेदन द्यावे असेही त्यांनी कळविलेले आहे.
पेन्शन आदेशाप्रमाणे जर आपले पेन्शन निघत नसेल तर तात्काळ सेवा पुस्तिका पडताळणीला देऊन पहावी अशा सूचना तालुका सचिव दिनकर येवतेकर यांनी दिल्या यांनी दिल्या. दर तीन महिन्याला तालुका शाखेची बैठक होईल असेही त्यांनी सांगितले. तालुका शाखेचे काम अध्यक्ष म्हणून राजाभाऊ सूर्यवंशी तर तालुका सचिव म्हणून दिनकर येवतेकर हे काम पाहतील असेही या बैठकीत ठरले. या बैठकीत जिल्हाध्यक्षांनी हे मार्गदर्शन केले.या बैठकीचे सूत्रसंचालन तालुका सचिव दिनकर येवतेकर यांनी केले, तर प्रास्ताविक ए. तु. कराड केले. मस्के सर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा