मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी परळीत केले स्वागत
परळी (प्रतिनिधी)
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गा पैकी बीड ते वडवणी मार्गावरील रेल्वे चाचणीसाठी परळी शहरात आलेल्या मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे परळी येथे सय्यद इस्माईल फर्मच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी स्वागत केले.
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गापैकी बीड ते वडवणी रेल्वे मार्गावर दि.१० व ११ डिसेंबर रोजी चाचणी घेण्यात आली.यानिमित्त रेल्वेच्या मध्य विभागाचे चिफ इंजिनिअर मनोज अरोरा,सीएओ अविनाश कुमार पांडे,सीई ब्रिजेश कुमार,अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गाचे उपमुख्य अभियंता डी.डी.लोळगे आदी अधिकारी हे दि.१० डिसेंबर रोजी परळी येथे आल्यानंतर प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.त्यानंतर परळी येथील अतिथी विश्रामगृहात बहादुरभाई यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा