पालि भाषा आणि बौद्ध तत्वज्ञानातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. अशोक सरवदे यांचा सन्मान
संभाजीनगर - प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अशोक सरवदे यांना पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज (आई.एस.बी.एस.) च्या २५ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गौरविण्यात आले. डॉ. सरवदे हे गेल्या ११ वर्षापासून पालि भाषा व बौद्ध तत्त्वज्ञान यावर संशोधन कार्य करीत असून त्यांनी ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यांचे विविध जर्नल्समध्ये ३० पेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित झाले असून १५ पेक्षा अधिक शोध निबंध विविध पुस्तकात प्रकाशित झाले आहेत. पालि भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञान या विषयावर त्यांची स्वतंत्र ५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी २ पुस्तके संपादीत केली आहेत. पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञान समृद्ध करण्यासाठी त्याचे मोठे योगदान राहिलेले आहे. हा पुरस्कार पालि भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाप्रती समर्पणाची दखल घेऊन मध्यप्रदेशातील सांची विद्यापीठ येथे आयोजित इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज (आई.एस.बी.एस.) च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परिषदेतील अनेक विद्वान, संशोधक, प्राध्यापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामध्ये संचालक प्रो. डॉ. सुधाकर शेंडगे, प्रो. डॉ. आनंद वाघ, प्रा. डॉ. समाधान इंगळे, प्रा. डॉ. नंदकिशोर खिल्लारे, प्रा. डॉ. सचिन बोराडे, प्रा. डॉ. किरण मोहोड यांनी डॉ. अशोक सरवदे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा