परळीत 13 डिसेंबर रोजी मी रमाई या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन
शहरातील आंबेडकरी प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी. बुद्धभूमी चारिटेबल ट्रस्ट आयोजित व प्रकाश वाघ निर्मित मी रमाई या एकपात्री नाट्यप्रयोगाचे परळी वैजनाथ शहरात आयोजन करण्यात आले आहे.या नाट्यप्रयोगास शहरातील बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निर्माते प्रकाश वाघ यांनी केले आहे. सिनेअभिनेत्री प्रियंका उबाळे या रमाईच्या भुमिकेत आहेत.
परळी वैजनात शहरात दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 5:00 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. परळी शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
या नाटकाचे दिग्दर्शक=प्राध्यापक रमाकांत भालेराव सर आहेत. लेखिका व रमाबाई आंबेडकर यांच्या मुख्य भूमिकेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत आम्ही जरांगे,डिलिव्हरी बॉय, प्रेमवारी, मलिका = बाळूमामाच्या नावानं चांगभलं,ज्ञानेश्वर माऊली,साता जन्माच्या गाठी,अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांचे शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनी असून त्यांनी अनेक वर्ष रमाई च्या आयुष्यावर संशोधन करुन रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास सांगणारे भारतातील पहिले नाटक उभे केले आहे.
घराघरात धाडसी रमाईचा इतिहास पोहोचवणारं ही संकल्पना घेवून सध्या त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे.या कार्यक्रमाला परळी शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.तसेच या नाटकाचे तांत्रिक कलावंत पार्श्व संगीत =अनिल दुधाटे…प्रकाश योजन,=माणिकचंद थोरात,नेपथ्य =विशाल धनंजय कहळे ,रंगभूषा = कमलाकर चव्हाण काजल चव्हाण,प्रगती गोधणे यांनी केल्या आहेत.
या प्रयोगासाठी तिकीटासाठी प्रकाश वाघ मोबाईल क्रमांक 9699510049, तसेच 9960515056 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा