पत्रकार बालाजी जगतकर यांना पितृशोक श्रावणराव जगतकर यांचे दुःखद निधन, सायंकाळी अंत्यसंस्कार

पत्रकार  बालाजी जगतकर यांना पितृशोक 

श्रावणराव जगतकर यांचे दुःखद निधन, सायंकाळी अंत्यसंस्कार 

परळी प्रतिनिधी       आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक तथा पत्रकार बालाजी जगतकर यांचे वडील व परळीतील सुपरिचित व्यक्तिमत्व श्रावणराव नामदेवराव जगतकर वय 75  यांचे अल्पशा आजाराने  16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1, 30 दरम्यान निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता भिम नगर येथील शांतीवन स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.

   श्रावणराव जगतकर मितभाषी, मनमिळावू स्वभावाचे व पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी समाजकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. विद्युत निर्मिती थर्मल पावर स्टेशन येथे ते नोकरीला लागल्यानंतर  त्यांनी आपली समाज सेवा व कार्य चालूच ठेवले होते. त्यानंतर विद्युत वितरण कंपनीत त्यांनी आपली सेवा दिली व त्याच ठिकाणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेतला होता. त्यांच्याजाने एक मोठी पोकळी परळी शहरात निर्माण झाली आहे. 
   त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले पत्रकार बालाजी जगतकर व दुसरा मुलगा राजू जगतकर बुलेट रेल्वे कतार येथे मॅनेजर आहे.एक मुलगी व सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी   5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने